जीवनात कष्टाशिवाय यश नाही - ह.भ.प.प्रकाश महाराज साठे

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज /प्रतिनिधी सागर आतकर

कन्हैय्या उदयोग समुहाच्या किर्तनसोहळ्यात आज तिसऱ्या  दिवशी विनोदाचार्य ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांची किर्तनसेवा झाली. जीवनात कष्टाशिवाय यश नाही. हे लंके परिवाराच्या यशस्वी वाटचालीवरुन दिसुन येते. आपल्या कामामध्ये इतके व्यस्त राहा की आपल्या वेळेचे महत्त्व इतरांना समजले पाहिजे. आपण यशस्वी असाल तर आपल्याकडे लोक येतील. आपल्याला अडचणीत आणणारे लोक आपल्याला कधीच मदत कधीच मदत करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या प्रगतीकडे लक्ष दया. या गुणांमुळेच कन्हैय्या उदयोग समुहाची प्रगती झाली. 

कन्हैय्या उद्योग समूहाची काही वर्षातच झालेला विस्तार पाहता आपल्याला हे विसरता येणार नाही. जीवनात राम कृष्ण हरी म्हणत जा यशाबरोबर शंभर टक्के समाधानी राहाल हीच पांडुरंगाच्या नामस्मरणात ताकद आहे.- ह.भ.प.प्रकाश महाराज साठे

किर्तन ऐकण्यासाठी निघोज तसेच पंचक्रोशीतील तसेच अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतात.

सर्व भाविकांचे स्वागत कन्हैय्या उदयोग समुहाचे सीईओ मच्छिंद्र लंके, संस्थापक शांताराम लंके व बबन लंके यांनी केले. सुत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कन्हैय्या उदयोग समुहाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top