महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर / प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर टोलनाक्याजवळ ६ ते ७ चोरांनी २ तरुणांना अडवून त्यांना मारहाण करत त्यांचे जवळील मोबाईल व पैसे काढून घेऊन तीखोल गावच्या दिशेने पळाले असल्याची माहिती समजताच पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड साहेब यांच्या आदेशान्वये पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल श्री सुरज कदम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती सर्व गावाला कळवली. त्यामुळे गावकरी सतर्क झाले. टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ व पोलीस यंत्रणेच्या तसेच ग्रामसुरक्षा प्रभावी यंत्रणेमुळे ६ चोर २ टूव्हीलर सह पकडण्यात यश आले.
यावेळी घटनास्थळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय ठाकूर तसेच पारनेर पोलीस स्टेशनचे अंमलदार उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद