![]() |
खिदमत फाउंडेशनला भिम रत्न देउन सन्मान करताना तसेच आंबेडकर जयंती निमित्त फळे वाटताना सदस्य |
सध्या राज्यात अनेक ठिकाणी दोन समाजा मध्ये वादविवाद घडुन दोन्ही समाजा मध्ये कटुता निर्माण होत आहे.
मात्र याला अपवाद आहे शिरुर शहर, गेल्या अनेक वर्षाचा भाईचारा जपत येथील खिदमत फॉउडेशन ने गेल्या चार वर्षापासुन सर्व समाजाच्या उत्सवात एक होत कोरोना काळापासुन विविध उपक्रम हाती घेतल्याने त्यांना नुकताच भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शिरुर शहरातील हाजी आसीफ शेख, हाजी फारुख बागवान, हाजी मुश्ताक शेख, हाजी फिरोज बागवान, आबिद शेख, फारुख सांगलीकर यांनी मिळुन हे खिदमत फाउडेशन सुरु केले.
या बाबत या फाउडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख यांनी सांगितले कि समाजातील सर्व जाती धर्माना बरोबर घेउन हे खिदमत फाउंडेशन काम करत असुन कोरोना काळात खऱ्या अर्थाने गरजुना अन्नधान्याचे किट वाटप करुन आरोग्य शिबीर तसेच दर वर्षी ८० गरजु कुटुंबाना एक महिन्याला पुरेल एवढा अन्नधान्य किट वाटप कोरोना काळापासुन सुरु केले असुन तसेच तीन वर्ष रमजान ईद निमित्त २०० जणाना किराणा किट चे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य शिबीर घेत चाळीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदु ऑपरेशन करण्यात आले तसेच शिवजयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान पाणी वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फळांचे वाटप करण्यात आल्याचे शेख यांनी सांगत कोरोना काळापासुन फाउंडेशनने रुग्णानसाठी बेड, व्हील चेअर, ऑक्सीजन तसेच इतर आरोग्य सेवा मोफत पुरवत असल्याचे शेख यांनी सांगितले. शासकिय गतिमंद शाळेत २१ अनाथ मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले हे सर्व गोष्टी करत असताना समाजातील अनेक दानशुर व्यक्तीनी तसेच डॉक्टर, हॉस्पीटल, सामाजिक संस्था यांनी मदत केले असल्याचे शेख यांनी सांगितले.
शिरुर शहरातील मुस्लीम युवक एकत्र येउन काय चांगले काम करु शकतात हे खिदमत फाउंडेशनने दाखवुन दिले आहे. त्यांच्या या कामा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद