निवेदन देताना शिवबा संघटना पदाधिकारी
शिवबा संघटनेकडे आल्या अनेक तक्रारी अनिल शेटे यांची माहिती
निघोज येथील सेन्ट्रल बँकेतील प्रकार
महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर
निघोज येथील सेंट्रल बॅंक संदर्भात अनेक वयोवृद्ध नागरिकांच्या तक्रारी शिवबा संघटनेच्या सहकार्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नागरीकांवर ओरडणे, योग्य माहिती न देणे, पासबुक भरून न देणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. वारंवार तोंडी सुचना देण्यात येत होत्या मात्र सुधारणा झाली नाही. वयोवृद्ध नागरीकांना पेंशन किंवा संजय गांधी योजनेचे पैसे काढण्यासाठी त्रास होत आहे. त्यांना बॅंकेत आणायलाही कोणी नसत अन अशा वेळेस जर त्यांना हेलपाटे मारावे लागले तर ते चुकिचे असल्याचे निदर्शनास आणून दिले.
वयोवृद्ध पेंशन किंवा संजय गांधी चे पेमेंट घरपोच मिळवून देण्यासाठी शिवबा संघटना प्रयत्नशिल राहणार असल्याची माहिती शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिली. व बॅंकेत कामकाजाविषयी फलक लावण्यात यावा याबाबत सुचना देण्यात आल्या. सुधारणा न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार व आंदोलन करण्यात येणार आहे.
मागण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, राजु भाऊ लाळगे, अशोक ढवळे, राजु लंके, बबन तनपुरे, भास्कर कवाद, मनोहर राऊत, संतोष देशमुख, मिनीनाथ कवाद तसेच शिवबा संघटना सहकारी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद