स्पर्धा परीक्षासाठी जिद्द व चिकाटी आवश्यक- गौरव वसंत वांढेकर

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज/ प्रतिनिधी सागर आतकर

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी आवश्यक असून आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी करणार असल्याची ग्वाही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या गौरव वसंत वांढेकर यांनी दिली आहे. 

निघोज येथील श्री मुलिका देवी महाविद्यालयात त्या निमित्ताने महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा कडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी गौरव यांचे वडील वसंत वांढेकर,आई नंदाताई यांचाही महाविद्यालय तसेच मित्र परिवार वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, उद्धव कराळे, ओमकार कराळे, प्राध्यापक डॉ गोविंदराव देशमुख, प्राध्यापक आनंद पाटेकर, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, जी आर एल कंट्रक्शनचे अध्यक्ष गणेशशेठ लामखडे, सामाजिक कार्यकर्ते विलासराव हारदे, पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष अप्पासाहेब वराळ, कुणाल तुपे आदी उपस्थित होते.

गौरव वांढेकर यावेळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रयत्न, सातत्य, चिकाटी मेहनत, नियोजन, सहनशीलता व सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा प्रसार ग्रामीण भागात होणे ही एक सकारात्मक बाब आहे. आपल्याला समाजासाठी देशासाठी तसेच देशाच्या प्रगती साठी ध्यास पूर्ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी यांनी अभ्यास करून आपल्यातील स्टेटस अधिकारी होऊन टिकवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी कुठलाही क्लास लावायची आवश्यकता नाही. स्वतः हार्ड वर्क करून त्यात यश संपादन करता येते असे सांगितले. 


मोबाईल स्टेटस पेक्षा समाजातील स्टेटस व ईमेजला महत्व देण्याचे सांगितले माझ्याकडे गेली पाच वर्षे छोटा मोबाईल होता मात्र माझी आई ही त्या मोबाईलची ऑपरेटर म्हणून काम पहात होती. म्हणून मला अभ्यासात जास्त लक्ष देता आले. आई महाविद्यालयात हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू करुण आई वडील यांच्या ऋणातून उतराई होण्याचा संदेश या महाविद्यालयाने दिला आहे. हीच भावना मनी ठेउन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उच्च शिक्षणासाठी आपण कार्यरत राहणार असून आपल्याला मराठवाडा व विदर्भात काम करण्याची संधी मिळाल्यास आई महाविद्यालयात हा डॉ. आहेर यांचा संदेश त्या ठिकाणी नेऊन आई व वडील यांचे स्थान आपल्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे. याची महती त्या ठिकाणी नेणार आहे.- गौरव वांढेकर


यावेळी प्राचार्य डॉ सहदेव आहेर म्हणाले की गेली अनेक वर्षात निघोज येथील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग हे युवा पिढीचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे अधिकारी घडवणारी केंद्र असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र यामधे असणार्‍या सोई सुविधा व महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र वाटचाल त्यांनी सांगितले. विद्यार्थी आपल्या यशातून व कार्यातून महाविद्यालय लौकिकात भर पाडतील अशी भावना व्यक्त केली. 

या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे यांनी केले तर आभार प्राध्यापक आनंद पाटेकर यांनी मांडले. सूत्रसंचालन प्राध्यापक नूतन गायकवाड यांनी केले. यावेळी प्राध्यापक डॉ गोविंदराव देशमुख, प्रा. विशाल रोकडे, प्रा. प्रविण जाधव, प्रा.मनीषा गाडीलकर, प्रा. पोपट सुंबरे, प्रा.सुमित गुणवंत, प्रा दुर्गा रायकर, प्रा. नीलिमा घुले, प्रा स्वाती मोरे, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधात्ते, प्रा. संदीप लंके, प्रा. नवनाथ घोगरे, डॉ. पोपट पठारे, प्रा. सचिन निघूट, अश्विनी सुपेकर, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. संगीता मांडगे, प्रा. तुषार जगदाळे, प्रा. वैशाली फंड, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. नम्रता थोरात, प्रा. प्रियंका लामखडे, प्रा. श्रद्धा ठुबे, प्रा. अशोक कवडे, नवनाथ घोगरे, अक्षय घेमुड, किशोर बाबर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top