ब्राम्ही लिपी ही भारताची आद्य लिपी होय- प्रा. कानिफनाथ शिंदे

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय 'ब्राह्मी लिपी मार्गदर्शन कार्यशाळा' संपन्न झाली या कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर होते.

यावेळी कानिफनाथ शिंदे यांनी ब्राम्ही लिपीचा उदय विकास व इतिहास याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ब्राम्ही लिपी अभ्यासक श्री. अजित भालसिंग यांनी ब्राह्मी लिपी व संशोधकीय गरज या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना ब्राम्ही लिपी हि भारतातील पहिली लिपी असल्याने ब्रह्मदेवाच्या नावापासूनच तिला ब्राह्मी लिपी हे नाव मिळाले असे सांगितले. 

भाषाशास्त्रामध्ये लिपीला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लिपी शिवाय भाषा ही दृश्यमान होऊ शकत नाही. तसेच आपल्या भारताची प्राथमिक भाषा पाली, प्राकृत व अर्धमागधी यांची लिपी ब्राह्मी लिपी असल्याने तिचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.-प्राचार्य, डॉ. सहदेव आहे

भारतास प्राचीनतम संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे.भारतात जेंव्हा लिखाणास गती मिळाली तेंव्हा प्रथमत: ब्राह्मी लिपी ही अस्तित्वात आलेली आपणाला दिसते. ब्राम्ही लिपी ही भारताची आद्य लिपी आहे. - प्रा.कानिफनाथ शिंदे
 

या कार्यशाळेप्रसंगी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, प्रा.आनंद पाटेकर,  प्रा.मनीषा गाडीलकर, प्रा. पोपट सुंबरे, प्रा.सुमित गुणवंत, प्रा दुर्गा रायकर, प्रा. नूतन गायकवाड, प्रा. नीलिमा घुले, प्रा  स्वाती मोरे, प्राध्यापक दुर्गा रायकर, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधात्त, प्रा. संदीप लंके, प्रा. नवनाथ घोगरे, डॉ. पोपट पठारे, प्रा. सचिन निघूट, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. संगीता मांडगे, प्रा. तुषार जगदाळे, प्रा. वैशाली फंड, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. नम्रता थोरात, प्रा. प्रियंका लामखडे, प्रा. श्रद्धा ठुबे, प्रा. अशोक कवडे, श्री. नवनाथ घोगरे, श्री. अक्षय घेमुड, श्री. किशोर बाबर उपस्थित होते.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक स्वागत व आयोजन इतिहास विभागप्रमुख प्रा. विशाल रोकडे यांनी केले तर आभार प्रा. अश्विनी सुपेकर यांनी मांडले. तर सूत्रसंचालन डॉ. गोविंद देशमुख यांनी केले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top