महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर /प्रतिनिधी-सागर आतकर
मुलिका देवी महाविद्यालयाच्या माध्यमातून एक आदर्श महाविद्यालय उभे करण्याचे काम प्राचार्य डॉ.सहदेव आहेर यांनी केले असून डॉ. आहेर यांचे शैक्षणिक योगदान सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर भास्करराव झावरे यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर येथील न्यु आर्ट्स, काॅमर्स अॅन्ड सायन्स काॅलेजमधे प्रा.डाॅ.सहदेव कोंडाजी आहेर यांच्या सेवापूर्वी समारंभाचे आयोजन केले होते. सरांनी सलग ३६ वर्षाची प्रदिर्घ सेवा केली. त्यामधे १० वर्ष प्राचार्य म्हणुन काम केले. या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या न्यु आर्ट्स, काॅमर्स, सायन्स काॅलेजचे प्राचार्य डाॅ.भास्करराव झावरे हे होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.भास्करराव झावरे म्हणाले, पळसपुर सारख्या छोट्या गावातुन खडतर परीस्थितीमधुन सहदेव आहेर आले. आम्ही एकत्र येवुन काम केले. सामाजिक बांधीलकी जपत, विणाचप्पल फिरत त्यांनी निघोज येथे शिक्षणाचे मंदिर उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक विद्यार्थी डाॅक्टर, इंजिनियर झाले. पण त्यांच्या कामाचा कळस हा निघोज येथील मुलीकादेवी महाविद्यालयामधेच झाला. जुन्या शिक्षकांचा आदर्श घेवुन ते शिक्षणाचे पवित्र कार्य पुढे नेण्याचे पवित्र काम आहेर सरांनी केले. पगारापूरती नोकरी न करता समाजासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. एवढे करुनही,कुटुंब कसे असावे, विद्यार्थी, समाजाप्रति काम कसे करावे, संस्था, काम विषयाप्रती कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे डाॅ.सहदेव आहेर सर खरं तर त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा असे सांगीतले.
पारनेर काॅलेजचे प्राचार्य डाॅ.रंगनाथ आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना प्राचार्य डाॅ.रंगनाथ आहेर म्हणाले, ३६ वर्ष अखंडपणे सेवा केल्यानंतर सेवा निवृत्तीनंतरही संस्थेने त्यांना ५ वर्ष मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन कामकाज पहायला सांगीतले आहे. विविध पदांवर आम्ही दोघांनी एकत्र काम केले. सरांनी अनेक पिढ्या घडवण्याचे काम केले. आपण केलेल्या कामाची नोंद पाठीमागे राहत असते. गावाला व कुटुंबाला आठवण राहील असेच काम सरांनी केल्याचे सांगीतले. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ म्हणाले,प्राचार्य डाॅ.सहदेव आहेर सर यांनी अवघड परीस्थीतीमधे शिक्षणाचे दृष्टीने निघोजकरांचा दृष्टीकोण बदलला.अनेक व्याख्यात्यांना बोलावुन मार्गदर्शन केले, पालक विद्यार्थी यांना एकत्र करुन सुसंवाद साधला, विविध कार्यक्रमांचे आयोजन करत प्रयोगशिल असलेल्या सरांनी सुंदर गार्डन तयार केले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली निघोज काॅलेजची उत्तरोत्तर प्रगती करावी असे सांगत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रा.डाॅ. सहदेव आहेर म्हणाले, मी केलेला एकही फोन वायाला गेला नाही. सर्वच उपस्थित राहीले याचा मनस्वी आनंद झाला. गरीब विद्यार्थी मदत, अनेक मित्रांच्या सुखदु:खामधे सहभागी होणे यामुळे मी घडत गेलो. वडील ९० वर्षाचे, आई ८५ वर्षाची असताना चालत माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला हजर झाले याचा मला आनंद आहे. काॅलेज पूर्ण झाल्यावर शिवछत्रपती ज्युनियर काॅलेज जुन्नर मधे जाॅब करत असताना, त्याचवेळी मला अहमदनगर जिल्हा मराठाच्या न्यु आर्ट्स काॅलेज नगरला जाॅब मिळाला. अनेक जेष्ठ शिक्षकांकडुन मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी घडत गेलो व आनंदी आहे. संस्थेने माझ्यावर जो विश्वास टाकला व पाठीवर शाबासकीची थाप दिली त्यामुळे मला उर्जा मिळाली. माझे कुटुंब चांगले संस्कारक्षम आहे. अनेक महाविद्यालयातुन विविध गोष्टी शिकायला मिळाल्या. १६९३ ला पीएचडी झालो. १२०० रु. पगारा पासुन काम केले. मी निघोजकरांचा जावई त्यामुळे मला कुठलीच अडचण येत नाही. अनेक मान्यवरांनी काॅलेजला आर्थिक मदत केली. कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके यांनी १ लक्ष रु. डोनेशन मिळाले. माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ तसेच त्यानंतर अनेक थोर दानशुर दात्यांनी निघोज काॅलेजला मदत केली. नेहमी विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन काम केले. सेवापूर्तीनंतर परत ५ वर्ष निघोजला काम करावे लागेल अशी सुचना अध्यक्ष मा.आ.नंदकुमार झावरे व सचिव जी.डी. खानदेशें कडुन आली. त्यामुळे मी अजुनही ५ वर्ष निवृत्त होत नाही. आपले प्रेम माझ्या पाठीशी सदैव असुदेत असे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी पारनेर काॅलेजचे प्राचार्य डाॅ.रंगनाथ आहेर, टाकळी ढोकेश्वरचे प्राचार्य मतकर, कन्हैय्या उद्योग समुहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके, निघोज नागरी पतसंस्था चेअरमन वसंत कवाद, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, माजी सरपंच लताबाई कवाद, संपदा नागरी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ, सचिन पाटील वराळ, आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण, मुलिका देवी विद्यालयात हभप रामचंद्र सुपेकर, निघोज परीसरचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, निघोजचे उपसरपंच माऊली वरखडे, डाॅ.तांबे, डाॅ. बाबर, कोंडीभाऊ आहेर, मातोश्री सुबाबाई आहेर, भाऊसाहेब आहेर, रावसाहेब आहेर, शिवाजी साबळे, डाॅ.कुलकर्णी, रखमा आहेर, डाॅ.पोकळे, डाॅ.गायकवाड, मा.प्राचार्य एकनाथ पठारे, डाॅ.विजया आहेर, पारनेर पत्रकार संघाचे संस्थापक संजय वाघमारे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, माजी अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, सचिव उदय शेरकर, खजिनदार विनोद गोळे, उपाध्यक्ष सनी सोनावळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्तात्रय गाडगे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी उणवणे, पत्रकार बाबाजी वाघमारे, पत्रकार सागर आतकर, पत्रकार सुरेश खोसे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, पत्रकार आनंद भुकन, पत्रकार संदीप गाडे, भास्करराव कवाद, मुलिका देवी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे, प्राध्यापक आनंद पाटेकर, प्राध्यापक गोविंदराव देशमुख, प्राध्यापक नंदकुमार उदार, पोपटराव कवाद, शांताराम कळसकर, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय लंके, आदींसह अनेक पत्रकार, पळसपूर व निघोज ग्रामस्थ विविध मान्यवर मोठ्या संखेने हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डाॅ. दिलीप ठुबे यांनी केले. सुत्रसंचालन हरीश शेळके आभार डाॅ.रविंद्र देशमुख यांनी मानले.
शैक्षणिक योगदान देताना पारनेर तालुक्यातील पत्रकार मित्रांनी सर्वाधिक सहकार्य केले असून मुलिका देवी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निघोज ग्रामस्थ व पत्रकार यांचे योगदान मोठे असून यासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले असल्याची माहिती प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांनी दिली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद