महाराष्ट्र दर्शन न्यूज |पारनेर
पारनेर तालुक्यातील कासारे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने लेझीम व ढोल ताशाच्या गजरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अहिल्यादेवींची महाआरती करण्यात आली.
यानंतर कासारे गावातील महिलांसाठी प्रथमच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. शंकर गवते प्रस्तुत लैभारी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अन खळखळून हसण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी प्रथमच विविध गेम शो मध्ये भाग घेतला. तसेच या खेळातील विजेत्यांना मानाची पैठणी, सोन्याची नथ, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमात प्रा. गवते सर यांच्यासोबत सौ.मनिषा गवते व टीम ने विविध गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी प्रथम क्रमांक सर्वोउत्कृष्ट महिला सोन्याची नथ सौ. सविता / श्री. संतोषशेठ दातीर ( व्हा. चेअरमन, वि. का. से. सो. कासारे) यांच्या वतीने, द्वितीय क्रमांक सर्वोउत्कृष्ट महिला सोन्याची नथ सौ. प्राजक्ता / श्री. कमलेशशेठ दातीर (बिरोबा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बिरोबा लॉजिस्टीक, मुंबई) यांच्या वतीने, तृतीय क्रमांक सर्वोउत्कृष्ट महिला सोन्याची नथ सौ. ताराबाई / श्री. कोंडिभाऊ दातीर (निवृत्त, पी.एस.आय. कासारे) यांच्या वतीने, चतुर्थ क्रमांक सर्वोउत्कृष्ट महिला सोन्याची नथ सौ. जनाबाई / श्री संपत दातीर (आदर्श ग्रामविकास अधिकारी, तालुकाध्यक्ष नगर तालुका ग्रामसेवक संघटना) यांच्या वतीने, क्रमांक पाच सर्वोउत्कृष्ट महिला
सोन्याची नथ सौ. तारामती / श्री संतोष दातीर (महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक / जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ रायगड) यांच्या वतीने तसेच
सौ. सुजाता / श्री. भगवानशेठ वाळुंज (श्री साई कलेक्शन, टाकळी ढोकेश्वर) यांच्या वतीने प्रथम/द्वितीय/तृतीय बक्षिस पैठणी साडी, व सौ. विमल / श्री. बाबासाहेबशेठ मंचरे (महालक्ष्मी साडी सेल टाकळी ढोकेश्वर) यांच्या वतीने चतुर्थ / पाचवे बक्षिस पैठणी साडी देण्यात आली. तसेच सौ नंदाबाई / श्री. नाना भाऊ दातीर यांचेकडून उत्तेजनार्थ क्रमांक साठी खास ३ आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमात सौ.दातीर यांनी प्रथम क्रमांक पटकवत सोन्याची नथ व मानाची पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या.
तसेच या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडीभाऊ दातीर (निवृत्त पी.एस.आय) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शिवाजीराव निमसे (संरपच कासारे) हे होते.
या वेळी नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर चे उपसभापती बापू शिर्के, धोंडिभाऊ दातीर (मा.सरपंच), तुळशीराम लगड (चेअरमन), शैलाताई घनवट (उपसंरपंच), संतोष दातीर (व्हा. चेअरमन), बाळासाहेब दातीर (मा.उपसंरपंच), श्री वसंत दातीर (सा.कार्यकर्ते), पोपट नरड सर, हरीभाऊ शिंदे सर, भाऊ पानमंद, निवृत्ती कासुटे (अन्याय निवारण समिती), संपत पानमंद सर, शंकरराव कासुटे, मांजारामशेठ दातीर, बाळासाहेब दातीर (मेजर), संपत दातीर (ग्रामविकास अधिकारी), ग्रामसेवक डेरे मॅडम, रमेश साळवे, गोविंद दातीर, विजय दातीर, रेवजी दातीर, डॉ.शंकर दातीर, ज्ञानदेव दातीर, बबन दातीर, केतन दातीर, राजू दातीर, उत्तम दातीर, गणेश दातीर, संदीप दातीर, रंगनाथ दातीर, संतोष दातीर, अक्षय दातीर, योगेश दातीर कमलेश दातीर,
गणेश दातीर, गोपाळ दातीर, राहुल दातीर, प्रताप दातीर(मेजर), सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संतोष दातीर यांनी केले तर माजी सरपंच धोंडिभाऊ दातीर यांनी सर्वांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद