येणाऱ्या वर्षात 1100 नवोदित तरुणांना रोजगार उपलब्ध होणार हायर कंपनीचे आश्वासन

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / शिरूर प्रतिनिधी - किरण चौधरी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र आणि हायर अप्लायन्सेस मध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. त्यामध्ये हायर कंपनीने येणाऱ्या वर्षात 1100 नवोदित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कराराद्वारे आश्वासन मान्य केले आहे.

त्यावेळी हायर कंपनीतर्फे अजिंक्य वारे आणि अंकलेश महाले यांनी कराराच्या कामकाजाची पूर्तता केली.

सदर करार हा श्री. रमेश बैस ( मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य ), श्री. मंगल प्रभात लोढा (मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, पर्यटन, महिला व बालविकास) यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ९ जून २०२३ रोजी यशदा पुणे येथे संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top