श्री.संत बाळूमामा यांच्या भक्तीत समस्त गव्हाणेवाडी सह पंचक्रोशी तल्लीन

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / श्रीगोंदा / प्रतिनिधी - किरण चौधरी

श्री. संत बाळूमामा यांची बग्गा नं १६ या पालखीचे समस्त ग्रामस्थ गव्हाणेवाडी करानी मोठ्या उत्साहात वाजत गाजत तसेच फटाक्याची आतिषबाजी करत स्वागत केले.

श्री. संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम तीन दिवस गव्हाणेवाडी ता.श्रीगोंदा येथे होता हा संपूर्ण परिसर बाळूमामांच्या नामाने दुमदुमून गेला होता. याठिकाणी जणू काही आदमापूर साकारले असे वाटत होते.

या सोहळ्यात नित्यनेमाने सकाळी ८.३० व संध्याकाळी ९.०० वाजता बाळूमामांची आरती होत होती. आरती झाल्यावर सर्व भाविक रांगेत दर्शन घेत होते. त्या नंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात होते. या तीन दिवसात पहिल्या दिवशी सोनलकरवस्ती दुसऱ्या दिवशी गव्हाणेवाडी तर तिसऱ्या दिवशी मोटेवाडी यांच्यामार्फत भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. दरम्यान गव्हाणेवाडी व पंचक्रोशीतील म्हणजेच शिरूर, श्रीगोंदा तसेच पारनेर तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली होती. या मध्ये लहानापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वच हजर होते. श्री. संत बाळूमामांच्या भक्तीत संपूर्ण परिसर तल्लीन झाला होता. मंगळवार (दि.१३) रोजी सकाळी वाजत गाजत बाळूमामा यांची पालखी मार्गस्थ झाली यावेळी या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला तसेच गव्हाणेवाडी ग्रामस्थांसह अनेक मान्यवर उस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top