महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर- रांधे / सागर आतकर
पारनेर तालुक्यातील रांधे येथील श्री. क्षेत्र विठ्ठलवाडी येथील संत श्री. बाळोबा महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन जिथे स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी प्रकट झाली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी, तमाम वारकरी विठ्ठलभक्तांची प्रतिपंढरी म्हणून ओळखले जाणारे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी देवस्थान, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्थ विठ्ठलवाडीकर रांधे यांच्या संयुक्त विद्यमाने देवषयनी आषाढी एकादशी उत्सव सोहळा वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या सहभागासोबत पांडुरंगाच्या कृपेने, बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने रविवार दि,२८ जुन २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठलभक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
१ ) पहाटे ४:३० अभिषेक, महापूजा व काकडआरती
२) सकाळी ८:०० ते १२:०० - विठ्ठलवाडी ते रांधे परत रांधे ते विठ्ठलवाडी असा पायी दिंडी सोहळा
३) दुपारी- १२ ते १:०० - पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन
४) दुपारी १ ते ३- ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ ठाणे यांचे सुश्राव्य भजन
५) दुपारी ३ ते ५ -गावोगावाहून येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत
६) संध्याकाळी- ५ ते ७- हरिपाठ
८) संध्याकाळी- ७ ते ९ शिव चरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांचे कीर्तन
व रात्री ९ वा. एकादशी भोजन फराळ.
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचे वारकरी रंगीत खडूद्वारे चित्रमय फलक रेखन!!!(फलकरेखाटन-ज्ञानेश्वर कवडे सर) |
एक आगळा वेगळा उत्सव सोहळा.
पांडुरंगाच्या नामात लिन करणारा उत्सव सोहळा,
मन प्रसन्न करणारा उत्सव सोहळा,
साक्षात पांडुरंग दर्शनच जणू... एक अद्वितीय सोहळा
एक कायम स्मरणात राहणारा उत्सव सोहळा
सर्वांनी या, आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.- स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्थ ग्रामस्थ रांधे विठ्ठलवाडीकर. ता. पारनेर
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद