महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील रांधे येथे कै.दत्तात्रय धोंडीराम गहाण्डुले यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. जालींदर महाराज नरवडे यांनी सुश्राव्य अशी प्रवचनरुपी सेवा सादर केली. यावेळी निरुपण करताना ह.भ.प. जालींदर महाराज नरवडे पुढे म्हणाले की, आपल्याकडे सत्ता संपत्ती, गाडी बंगला असेल पण आचरण जर चांगले नसेल, तर उपयोग नाही. जीवन सार्थकी लावायचे, तर संतसंग महत्वाचा आहे. आईवडीलांची सेवा करा त्यामुळे काशीचे पुण्य लाभते. आज लाखो वारकरी पंढरीच्या परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेत. लोकांना नरदेहाची किंमत कळत नाही. क्षणभंगूर जीवनाचा भरवसा नाही. त्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करावे. दिवंगत दत्तात्रय धोंडीराम गहाणडुले यांनी जीवनात येवुन मुलांवर चांगले संस्कार केले. म्हणुनच आज सर्व मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे उच्च शिक्षित आहेत. हे चांगल्या कर्माचे फळ असल्याचे ह.भ.प. नरवडे महाराज म्हणाले.
मनुष्य जन्मामध्ये येवून ईश्वराचे नामस्मरण केले तरच जन्माला आल्याचे सार्थक होईल. देवाला आपलेसे केले तर जीवनामध्ये सुख प्राप्ती होईल. त्यासाठी संत संगती महत्वाची आहे. प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प जालिंदर महाराज तामखडे
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त केंद्रप्रमुख व ग्राम पंचायत सदस्य दिलीप आवारी, जेष्ठ पत्रकार दत्ताजी उनवणे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब आवारी, शिवसेना शाखाप्रमुख अनिल आवारी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पांढरकर, रुपेश ढवण, दस्तगीर तांबोळी, जयसिंग आवारी, संजय आवारी, जयसिंग कारखिले, दत्तात्रय भोस गुरुजी, किरण गहाणडुले, भास्करराव पठारे, लक्ष्मण शेळके, रामचंद्र आवारी, विलास आवारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व आप्तेष्ट उपस्थित होते.
दिवंगत दत्तात्रय गहाणडुले यांची पत्नी श्रीमती हेमलता गहाणडुले, मुलगा चंद्रशेखर गहाणडुले, विवेक गहाणडुले, मुलगी रोहिणी शिवाजी तामखडे, निलम सुरेश खोसे पाटील, जावई पत्रकार सुरेश खोसे पाटील, शिवाजीराव तामखडे आणि नातवंडे उपस्थित होते. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी साप्ताहिक पारनेर समर्थचे संपादक पत्रकार सुरेश खोसे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद