तातडीने शिक्षकांची नेमणूक करा अन्यथा आंदोलन - शिवबा संघटना

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी- सागर आतकर

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील जिल्हा परीषद शाळेत १ ली ते सातवी पर्यंत वर्ग शिकवले जातात. आजूबाजूच्या गावातील विदयार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. मात्र गेले वर्षभरापासुन हि शाळा शिक्षकाविनाच सुरु आहे. वर्ग ७ व शिक्षक २ त्यात एक मुख्याध्यापक असल्याने पुर्ण वेळ काम १ च शिक्षक करतोय!! यासंदर्भात शिवबा संघटना शाखा प्रमुख ज्ञानेश्वर खोसे व सहकारी अनेक दिवसापासून शिक्षक भरतीसाठी पाठपुरावा करत होते मात्र शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. विदयार्थी बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी शिवबा संघटना आक्रमक झाली आहे. प्रश्न सुटला नाहि तर शिवबा संघटना पदाधिकारी व सहकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. 

यासंदर्भात निवेदन शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांच्या सुचनेनुसार व तालुका प्रमुख बबन तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षण अधिकारी मा. विनेश लाळगे व गटविकास अधिकारी सौ. जोत्सना मुळीक याना निवेदन देण्यात आले. यावेळी विदयार्थी संघटना तालुकाप्रमुख मच्छिंद्र लाळगे, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर खोसे, शेतकरी संघटना तालुकाप्रमुख जयराम सरडे, पारनेर शहर प्रमुख निलेश दरेकर, महेश ढवण, प्रशांत काळे, विशाल बेलोटे, निलेश तिकोणे आदि सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top