महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरूर येथे सध्याच्या राजकीय घडामोडीवर सरकार विरुद्ध एक सही संतापाची मोहीम राबवून शिरूरकरांनी संताप केला व्यक्त

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज/ शिरूर / प्रतिनिधी- किरण चौधरी

सध्याच्या राजकिय घडामोडीवर शिरूर शहरांमध्ये मनसे च्या वतीने संतापाची एक सही व लोकांचे मत या साठी आज शनिवारी दिनांक ८ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मारक शिरुर येथे सहीची मोहीम हा कार्यक्रम चालु झाले आहे. या मोहीमेला शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होत असताना दिसून येतं होते. आपली एक संतापाची सही करुन आपले मत सुन्या नागरिकांनी सही द्वारे मांडले आहे. एक सही संतापाची या मनसेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रविंद्र ऊर्फ बापू सानप, राजेंद्र क्षीरसागर, गणेश खोले, अनिल बांडे, दिलीप मैड यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. या एक सही संतापाची या मोहिमेचे नियोजन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, मनसेचे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मा. जनहितचे मा.शहराध्यक्ष रवी लेंडे, विधी तालुकाध्यक्ष अॅड.आदित्य मैड यांनी केले. या वेळी संदिप कडेकर, मनसे महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, शारदा भुजबळ, स्वप्निल माळवे, तारुआक्का पठारे, रमणलालजी भंडारी, बंडू दुधाणे, चंद्रकांत जाधव, अॅड.सुमेध डोंगरे, संदीप ओव्हळल, मंगेश कांबळे आदी.मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मनसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top