महाराष्ट्र दर्शन न्यूज / पाटोदा / गणेश शेवाळे
एक ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती तर त्यांनी दिडशे वर्ष राज्य भारत देशावर केले आता तर पवनचक्क्याच्या अनेक कंपन्या राज्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमीन खरेदी केल्या असल्यामुळे शेतकरी चिंता निर्माण झाले असून याचाच प्रत्यय वैद्यकिन्ही येतील शेतकऱ्याला आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेनिव्ह प्रा.लि. पॉवर कंपनी व वेदांश इन्फ्रा प्रा.लि. कंपनी या दोन कंपन्यानी शेतात जाणारा नकाशावरील शेतात जाणारे रस्ते जूना वैद्यकिन्ही ते लिंबागणेश रस्ता व वैद्यकिन्ही महाजनवाडी, वाघीरा शिव रस्ता बंद केला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे दि. २६/०६/२०२३ रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे शेताची मशागत, पेरणी करण्यासाठी विलंब झालेला आहे. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झालेले आहे तरी सदरील रस्ते तात्काळ मोकळे करुन देऊन चालु करण्यात यावेत. दोन्ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तोंडी विचारणा केली असता ते म्हणाले अशा कितीपण तक्रारी दिल्यातरी आमचे काही होत नाही सर्व अधिकारी व राजकीय पुढारी यांना आम्ही पैसे दिलेले आहेत त्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही आम्ही तुम्हाला रस्ता देणार नाहीत तुम्ही कोठेपण जा आमच्या कंपाऊड मधुन जायचे नाही.
शेतकरी हा अल्पभुधारक शेतकरी असुन कुटूंबाचा उदरनिर्वाह हा याच शेतीच्या पिकावर अवलबून आहे सध्या पेरणी न झाल्यामुळे माझ्या कुटूंबावर संकट आलेले आहे. तात्काळ संबधीत कपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करून माझा रस्ता मला मोकळा करुन देण्यात यावा नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशाऱ्या देऊन ही कसलाही विचार केला नाही व अधिकारी यांनी दखल घेतली नाही त्यामुळे माझ्या शेतात पेरणी झालेली नाही माझे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी विनंती की, दि. १४/०७/२०२३ पर्यंत संबधीतावर कंपनीवर कडक कारवाई करुन माझा रस्ता मोकळा करून देण्यात यावा नाहीतर मी कोठेही आत्महत्या करील याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी दोन्ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व शासन यांच्यावर राहील. अशी लेखी तक्रार नामें सत्यवान जयवंत शिंदे या शेतकऱ्यांनी पाटोदा तहसील कार्यालयाकडे देण्यात आली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद