महाराष्ट्र दर्शन न्यूज / पाटोदा / गणेश शेवाळे
आष्टी तालुक्यातील कुंटेफळ तलावाच्या श्रेयवादावर दोन्ही आमदारांमध्ये चढावढ लागल्यामुळे दोन्ही आमदार साहेबांनी प्रश्न सोडवावे अशी मागणी पाटोदेकरांनी केली आहे.
पाटोदा तालुक्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न खालील प्रमाणे:-
१) चुंबळी फाट्यावर जाणाऱ्या एसटी बस गाड्या पाटोदा बस स्टॅन्ड मध्ये येण्यास बंधनकारक करावा.
२) पाटोदा तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंजूर करावा.
३) पैठण पंढरपूर रस्त्यावरील डोंगरकिनी घाट व पाटोदा शहरात राहिलेले अर्धवट रस्ते तात्काळ पूर्ण करावा.
४)पाटोदा येथे सिनियर डीवजन मंजुरी साठी प्रयत्न करावा.
५) पाटोदा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येने व मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करावे.
ह्या मागण्याकडे दोन्ही आमदार साहेबांनी लक्ष देऊन या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी पाटोदेकरांकडून होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद