पारनेर येथे मराठी पत्रकार संघाचे वतीने पारनेरच्या तहसिलदार गायत्री सौंदाणे यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधव
महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी- सागर आतकर
धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांनाच, पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती देण्यात आली आहे. न्यास नोंदणीचा व संघटना नोंदणीचा स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत असे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागाने थेट पत्रकारांच्या सेवाभावी संस्थांनाच संघटना गृहित धरले आहे. याबाबत चौकशी करुन चुकीचे प्रस्ताव मंजुर करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने पारनेरच्या तहसिलदार गायत्री सौंदाणे यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव दत्ता गाडगे व तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड यांचे हस्ते सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत हे निवेदन दि.१७ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ११ जुलै २०२३ रोजी राज्य अधिस्वीकृती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठित करण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. वरील विषयाला अनुसरुन, माहिती आणि जनसंपर्क विभागासह सामान्य प्रशासन विभागानेही कोणतीही खातरजमा न करता काही लोकांच्या प्रभावामुळे चुकीच्या पध्दतीने अधिस्वीकृती समितीवर सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने संस्थांना संघटना दाखवून सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि नियमानुसार कामगार आयुक्त यांच्याकडे कामगार कायद्यांतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली- दत्ता गाडगे ( जिल्हा सचिव, राज्य मराठी पत्रकार संघ)
याप्रसंगी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे, तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड, सचिव बाबाजी वाघमारे, कार्याध्यक्ष संजय मोरे, तालुका उपाध्यक्ष शिरीष शेलार, वृत्तवाहीणी प्रमुख श्रीनिवास शिंदे, खजिनदार संतोष कोरडे, संपर्कप्रमुख विशाल फटांगडे, प्रसिध्दी प्रमुख विजय रासकर, पारनेर शहर प्रमुख संतोष तांबे, निघोज शहर प्रमुख सागर आतकर, सदस्य खोसे सुरेश, आनंदा भुकन, गंगाधर धावडे, ज्ञानेश्वर लोंढे, वसंत रांधवन, अविनाश भांबरे, संपत वैरागर, सदानंद सोनावळे, संदिप गाडे, गणेश जगदाळे, महेश शिंगोटे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संखेने हजर होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद