महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील रांधे येथील माध्यमिक शिक्षक विवेक दत्तात्रय गहाणडुले यांचा इयत्ता ८वी मध्ये शिकणारा मुलगा अद्वैत व मुलगी आश्लेषा या भावंडांनी नुकत्याच फेब्रुवारी मध्ये झालेल्या शिष्युवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
अद्वैत याने २६० गुण मिळवून जिल्ह्यात ८ वा तर आश्लेषा ने २४६ गुण मिळवून २३ वा क्रमांक मिळविला असून नगर येथील रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मी विद्यालयात शिक्षण घेत आहे. या भावंडानी यापुर्वी झालेल्या इयत्ता पाचवी मधील शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ.सी.व्ही रामन बाल वैज्ञानिक परीक्षा, राज्य इन्स्पायर अवार्ड, राज्य स्तरीय विज्ञान परिषद या आणि इतर स्पर्धेत सहभागी होवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ.सी.व्ही रामन बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याने मागील महिन्यातच या दोन्ही भावंडांना श्रीहरीकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन [ इस्रो ] केंद्राला भेट देण्याची संधी प्राप्त झाली व तेथील शास्त्रज्ञांशी चर्चा विचार विनमय करण्याची बहुमुल्य संधीही प्राप्त झाली होती.
या भावंडांचे आई वडील शिक्षक असून त्यांचे व त्यांना वर्ग शिक्षिका झावरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाचे रांधे परिसरातुन कौतूक होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद