महाराष्ट्र दर्शन न्यूज : पारनेर अपडेट
राज्य शासनाकडून वयोवृद्ध नागरिक, विधवा, परित्यक्त्या, अपंग यांना देण्यात येणारे मासिक अनुदान गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या तालुक्याच्या विविध गावातील वयोवृध्द नागरिकांसह जितेश सरडे, राहुल झावरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काही काळ गेट बंद आंदोलन करण्यात आले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
याबाबत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अॅड. राहुल झावरे, जितेश सरडे, अनिल शिंदे, अमित जाधव, हनुमंत भोसले, संभाजी नरसाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत प्रश्नाची तड लागेपर्यंत गेट बंद आंदोलन केले. हयातीच्या दाखल्यांवर हा गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठी दाखला देत नाही तर दुसरीकडे तहसील कार्यालयातील अधिकारी आंदोलकांना दारातही उभे करीत नाहीत, असा प्रकार तहसील कार्यालयात वयोवृद्धांना अनुभवास आला, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद