महाराष्ट्र दर्शन न्यूज / पाटोदा / प्रतिनिधी गणेश शेवाळे
उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस पाटोदा शहराच्या नगराध्यक्षपदी सर्व सामान्याच्या सुखदुःखात हाकेला धावून जाणारे सर्वांना आपलेसा वाटणारा युवा चेहरा गरिबांच्या मदतीला धावून येणारा चेहरा पाटोदा पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणारे राजू भैय्या जाधव यांच्या पत्नी सौ.दिपाली राजू जाधव यांना पाटोद्याचा नगरपंचायत नगराध्यक्ष पदी संधी दिल्या मुळे सर्व सामान्य नागरिक व एकनिष्ठ कार्यकर्त्यात मध्ये आनंदाचे वातावरण पाहिला मिळत असून आमदार धस यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे भविष्यातील निवडणुकीत आमदार सुरेश धस अण्णांना पाटोदा तालुक्यातून नक्कीच फायदा होणार असून लोकनेते आमदार सुरेश धस आण्णांनी नवनिर्वाचित नगर अध्यक्ष राजू भैया जाधव व त्यांच्या पत्नी यांना पेढा भरून पाटोदा नगरपंचायतचा कारभार हातात दिला यामुळे नगराध्यक्षा सौ. दीपालीताई राजू भैय्या जाधव व त्याचे शेकडो सहकारी आष्टी येथे जाऊन आभार मानले संवेदनशील असलेले आमदार सुरेश धस यांनी इरशाळवाडी आपद्ग्रस्तांचा संदर्भ देत सत्कार स्विकारला नाही. लोकभावनेला कायम प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाची प्रचिती आज पुन्हा कार्यकर्त्यांना पाटोदेकराना दिसून आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजू जाधव यांना पुढील कार्यासाठी आमदार सुरेश धस, युवा नेते जयदत्त धस, प्राजक्ताताई (काकू) धस, सागर धस यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पाटोदा नगरपंचायत सभापती, नगरसेवक, पत्रकार, नेतेमंडळी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद