राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी करण तांदळे तर उपाध्यक्ष पदी आसाराम सानप यांची निवड

0


महाराष्ट्र दर्शन न्यूज / पाटोदा / गणेश शेवाळे

आपल्या प्रभावशाली वाणीतून समाज प्रबोधनाचे अलौकिक कार्य केलेले आधुनिक युगातील थोर समाज सुधारक, ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी राष्ट्रसंत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव समिती बैठक आज पाटोदा येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. सर्वानुमते राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी करण तांदळे यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी आसाराम सानप यांची निवड करण्यात आली असून जयंती उत्सव समितीच्या सचिवपदी प्रदीप नागरगोजे व ऋषिकेश सानप यांची निवड करण्यात आली.

यावेळी तालुक्यातील सर्व भक्तगण व ज्येष्ठ मार्गदर्शक मोठ्या सख्येंने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top