महाराष्ट्र दर्शन न्यूज / पाटोदा / प्रतिनिधी - गणेश शेवाळे
मनिपुर येथे ३ मे पासुन दलित आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी पाटोदा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दणका मोर्चाचे दि.३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वा. सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज चौक ते राजमोहम्मद चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधुन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चामध्ये आष्टी, पाटोदा व शिरुर तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती व जमाती चे सर्व नागरिक सहभागी होणार आहेत.
या मोर्चामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आदिवासी समाज संघटना, भटक्या विमुक्त जमाती संघटना, एकलव्य संघटना, बिर्सा मुंडा संघटना, जय लहुजी संघटना, डेमो क्रोटिक पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व इत्यादी सहभागी होणार आहेत. तरी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रतिक जावळे यांच्याकडून आव्हान करण्यात येत आहे की, मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून मणिपूर येथील सर्व मृत बंधु भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी उपस्थित राहावे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद