स्पर्धा परीक्षा म्हणजे मेहनत शिस्त, जिद्द, चिकाटी याचा समुच्चय- डॉ. सहदेव आहेर

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालय येथे स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मा. प्रियंका कवाद शेटे, मा.ज्ञानेश्वर शिरोळे, मा. दर्शन थोरात आणि मा. अमोल झंजाड या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आला.

त्यांचा शैक्षणिक अनुभव व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निघोज परिसरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर उपस्थित होते.

एच.के.भळगट (शिरूर पाच कंदील चौक)

यावेळी मा. प्रियंका कवाद-शेटे म्हणाल्या की स्पर्धा परीक्षा करताना अभ्यासात सातत्य व नियोजन आवश्यक असते. मा.ज्ञानेश्वर शिरोळे म्हणाले की महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पदवी पहिल्या वर्षापासूनच स्पर्धा परीक्षासाठी आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करावी. मा. दर्शन थोरात आणि मा. अमोल झंजाड यांनी आपले स्व-अनुभव विद्यार्थ्यांना सांगत परिस्थितीवर मात करण्याची शिकवण देऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.

प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे मेहनत शिस्त जिद्द चिकाटी याचा समुच्चय आहे असे म्हटले. स्पर्धा परीक्षांचे यश म्हणजे कष्टमय प्रवासाचे सुवर्णफळ असून जिल्हा मराठा संस्था व मुलीकादेवी महाविद्यालय यांनी नेहमीच अशा गुणवंतांचा सन्मान करून समाजापुढे एक अभिनव आदर्श घालून दिला आहे.

यावेळी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नवनियुक्त अधिकारी मा. गौरव वांढेकर यांनी या कार्यक्रमा दरम्यान आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी नेहमीच या गुणवंतांची ओळख प्रसिद्धी माध्यमातून समाजा पर्यंत पोहोचवली आहे. यांचे महाविद्यालय वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शंकर लामखडे, सुभाष कवाद तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रा. अशोक कवडे, प्रा. विशाल रोकडे, प्रा. प्रविण जाधव, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा.सुमित गुणवंत, प्रा दुर्गा रायकर,  प्रा. नीलिमा घुले, प्रा  स्वाती मोरे, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधाक्ते , डॉ. पोपट पठारे, प्रा. सचिन निघूट, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. तुषार जगदाळे, प्रा. नीलिमा घुले, प्रा. वृषाली जगदाळे, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. वैशाली फंड, प्रा. संगीता मांडगे, प्रा. अश्विनी सुपेकर, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. नम्रता थोरात, श्री. संदीप लंके, श्री. नवनाथ घोगरे, श्री. अक्षय घेमुड, श्री. किशोर बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ. मनोहर एरंडे यांनी केले तर आभार प्रा. आनंद पाटेकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रा. नूतन गायकवाड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top