लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधा : तहसीलदार म्हस्के यांचे आवाहन

0


शिरूर / प्रतिनिधी - किरण चौधरी
        पुणे जिल्हयामध्ये दुष्काळाचे संकट असल्याने शिरुर तालुक्यामध्ये शेती सिंचनासाठी पाण्याच्या पातळीत वाढ करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधकाम मोहिम राबविण्याचे आवाहन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले.
अल निनोच्या प्रभावामुळे पुणे जिल्हयामध्ये दुष्काळाचे संकट असल्याने संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करणे तसेच शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढवून दुबार पिके, भाजीपाला, रब्बी पिके उत्पादन करण्याची क्षमतावृद्धी निर्माण करणेच्या दृष्टीने व जिल्हयाची भौगोलिक परस्थिती लक्षात घेवून मोठ्या प्रमाणावर ओढे, नाले इत्यादी जलस्त्रोतांना बांध घातल्यास पाणी अडविल्यास ठिक-ठिकाणी पाण्याचे साठे उपलब्ध होवून त्या काठच्या शेतक-यांना वरील पाण्याचा उपयोग होईल. मा.जिल्हाधिकारी पुणे यांचे संकल्पनेतून व उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधकाम मोहिम राबविणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शिरुर तालुक्यामध्ये महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, वनविभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने एकुण ७०० वनराई बंधारे बांध-बंदिस्ती करुन पाण्याचे जलस्त्रोत बळकट करणेसाठी नियोजन करणेत आलेले आहे. तसेच आज अखेर वन विभागामार्फत ३६ व कृषी विभागामार्फत २६ असे एकुण ६२ वनराई बंधारे बांध-बंदिस्ती करणेत आलेले आहेत.

शिरुर तालुक्यामधील सर्व नागरीकांना, सामाजिक संस्था, विद्यालये / महाविद्यालये, औद्योगिक आस्थापना व इतर यांना आवाहन करणेत येते की, वरीलप्रमाणे करणेत येणा-या कामकाजामध्ये आपला सहभाग नोंदवून जास्तीत-जास्तजलस्त्रोत बळकट होतील या दृष्टीने वरील सर्व विभागांना जास्तीत-जास्त नागरीकांनी
सहभागी होवून सहकार्य करावे- बाळासाहेब म्हस्के ( तहसीलदार, शिरूर)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top