![]() |
आनंदाचा शिधा घेताना लाभार्थी (फोटो- किरण चौधरी) |
शिरूर / प्रतिनिधी - किरण चौधरी
शिरूर तालुक्यातील रेशनिंग दुकानांमधून आनंदाचा शिधा वाटपाचा कामास सुरवात झाल्याची माहिती शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली. तालुक्यातील १३७ रेशनिंग दुकानदारांच्या माध्यमातून ४६१५० लाभार्थ्यांना या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे.
आनंदाचा शिधाच्या किटमध्ये शंभर रुपयांत एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो चणा डाळीचे सर्वत्र वितरण करण्यात येणार असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे यांनी केले आहे. तालुक्यातील १३७ रेशनिंग दुकानदारांच्या माध्यमातून ४६१५० लाभार्थ्यांना या शिधाचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा अव्वल कारकून निलेश घोडके यांनी सांगितले.
आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आल्याने लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद