मराठी पाट्यांच्या मुद्यावर शिरुर मनसेने दिले मुख्याधिकारी यांना अल्टीमेटम...

0

शिरूर / प्रतिनिधी: किरण चौधरी

     नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना शिरूर शहर मनसेने निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, भारतातील सर्व आस्थापनांवरील नामफलक ठळक मराठीत करणे बाबतच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. मा सर्वोच्च न्यायालयाने व महाराष्ट्र शासनाने आदेशीत केले प्रमाणे, राज्यातील सर्व आस्थापनांचे नामफलक हे ठळक देवनागरी मराठी भाषेत असणे गरजेचे आहे. ज्या आस्थापनांवरील नामफलक मराठीत नाहीत अशा आस्थापनांना २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिलेली होती. ज्या आस्थापनाचे नामफलक मराठीत करणार नाहीत त्यांचेवर कारवाईचे स्वरूप मा. सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत उलटूनही शिरूर शहरातील अनेक आस्थापनांचे नामफलक हे इंग्रजी भाषेत आहे. नगरपालिका प्रशासनाने सबंधित आस्थापनांवर तात्काळ त्यांचे नामफलक ठळक मराठीमध्ये करणेसाठी कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच ज्या आस्थापनाचे नामफलक बदलण्यास विरोध करत असतील त्यांच्यावर तात्काळ आदेश देऊन कारवाई करण्यात यावी. पुढील १५ दिवसांत जर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. तर आपलेविरूध्द मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केले प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. तरी शिरूर शहरातील सर्व आस्थापनांचे नामफलक पुढील १५ दिवसांत ठळक मराठीत पाट्या करण्यात यावी‌. हा तात्काळ कारवाई आदेश देण्यात यावा. अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल. असे मनसेचे शहराध्यक्ष ॲड.आदित्य मैड, मनसे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे महिला आघाडीचे डॉ.वैशाली साखरे, मनसेचे जनहित माजी शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी निवेदन दिले. यावेळी ॲड. शुभम माळी, सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी हे देखील उपस्थित होते. मुख्याधिकारी काळे यांना निवेदन दिले असता मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्याधिकारी यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top