पाटोदा / प्रतिनिधी: गणेश शेवाळे
निजाम कालीन पाटोदा तालुका असलातरी विकासा पासून कोसोदूर लांब राहिला आहे यांचे कारण म्हणजे स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जाधव व अॕड.शाहुराव जाधव यांच्या निधनानंतर पाटोदा तालुक्यात एकही स्वयंभू खंबीर नेतृत्व तयार झाले नसल्यामुळे पाटोदा तालुक्यात काहीही करायचे असेल तर पहिले आष्टीवाल्याना विचारावा लागते यामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न पडुन आहेत अधिकारी, कर्मच्यारी कामचुकार पणा करतात कोणत्याही शासकीय कार्यालयात संपूर्ण वेळ कर्मचारी नसतात यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे शासकीय कामे होत नाहीत तसेच पाटोदा बस स्थानकात एसटी बस न येता चुंबळी फाट्यावरून सर्व बस जातात ग्रामीण रुग्णालयात सर्व यंत्रणा नसल्याने योग्य उपचार रुग्णांना मिळत नाही, यामुळे पाटोदा तालुक्यातील कार्यक्रत्यानी पाटोदा तालुक्यातील खालील जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपल्या नेत्यांना धारेवर धरावे, व खालील आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
१) आमच्या हक्काचे उपजिल्हा रुग्णालय आष्टीत पळवल्यामुळे पाटोदा तालुक्यात पहिले ट्रामा केंअर सेंटर चालु करुन तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी.
२) चुंबळी फाट्यावरून जाणाऱ्या एसटी बस गाड्या पाटोदा बस स्टॅन्ड मध्ये येण्यास बंधनकारक करावा.
३) पैठण पंढरपूर रस्त्यावरील डोंगरकिनी घाट व पाटोदा शहरात राहिलेले अर्धवट रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावा.
४) पाटोदा येथे सिनियर डीवजन मंजुर करावा.
५) पाटोदा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येणे व मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करण्यात यावे.
आमच्या याच मागण्यांसाठी पाटोद्यातील दोन्ही आमदारांच्या कार्यक्रत्यानी आपल्या नेत्यांना धारेवर धरावे नसता विधानसभा निवडणुकीत मतदान मागताना पाटोद्यातील जनता तुम्हाला धारेवर धरतील.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद