पाटोदा / प्रतिनिधी : गणेश शेवाळे
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही घाटातील रस्त्याचे काम सुरू करावा म्हणून डोगरकिन्ही येथील सत्तेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पैठण पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही जवळील मळेकरवाडी घाटातील रस्ता अत्यंत खराब झाला होता. त्या घाटातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आंदोलन केल्यानंतर तात्काळ चालू झाले.
सविस्तर वृत्त - पाटोदा तालुक्यातील पैठण पंढरपूर मार्गावर असलेल्या डोंगरकिंन्ही घाटातील रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यामुळे डोंगरकिन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य दुशंत येवले व ग्रामस्थ यांनी रस्ताचे काम चालू व्हावे म्हणून आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी तात्काळ डोगरकिंन्ही घाटातील रस्त्याचे काम तात्काळ चालू झाले. यावेळी या आंदोलनात सहभागी ग्रामस्थ डॉ. दुशंत येवले, पांडुरंग म्हस्के, पप्पु मांडवे, अतुल दळवी, संतोष नाना येवले, संतोष राऊत, दादा येवले, काकडे आप्पा, अमोल चव्हाण, अमोल येवले पत्रकार, अभिमान मळेकर, बाप्पु रायते माजी सरपंच, पुरूषोत्तम येवले, गणेश म्हस्के इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद