निघोज येथे मळगंगा सामुदायिक तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन

0



निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

        पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा सामुदायिक तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या तुळशी विवाह सोहळ्याचे हे बारावे वर्ष आहे. 

माता मळगंगा देवीच्या कृपाआशीर्वादाने सर्वांच्या सहकार्यामुळे या वर्षी या तुलसी विवाह सोहळ्याला १२ वर्ष आहे त्यानिमित्ताने ३/११/२०२३ ते ९/११/२०२३ या कालावधी मध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचनिमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी तुलसी विवाहाचे नियोजन करण्यात आले आहे. असे मळगंगा सामुदायिक तुलसी विवाह कमिटी अध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी सांगितले.

दिनांक २४/११/२०२३ रोजी कपिलेश्वर मंगल कार्यालय येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

सायंकाळी ७ वाजता श्रीराम भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रुप ग्रामपंचायत निघोज, मळगंगा साईधाम युवा गणेश मंडळ, आपला गणपती मित्र मंडळ, बालगोपाळ मळगंगा साईधाम गणेश मंडळ, मळगंगा सामुदायिक तुलसी विवाह मंडळ व समस्त ग्रामस्थ निघोज यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top