केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेला जुलमी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ड्रायव्हर संघटनेचे थेरला फाट्यावर रस्ता रोको आंदोलन

0



पाटोदा/ प्रतिनिधी- गणेश शेवाळे

     रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा व सात लाख दंड या नव्या कायद्याविरोधात पाटोद्यातील ड्रायव्हर संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरून पाटोदा ते बीड मार्गावरील थेरला फाटा येथे रस्ता रोको करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मार्ग मोकळा केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याने तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी पाटोदा तालुक्यातील थेरला गावातील संतप्त ड्रायव्हर रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात पाटोदा ते बीड रस्त्यावरील थेरला फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यानंतर पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत तहसील प्रशासनाला निवेदन घेऊन आंदोलन सोडण्यात आले. यावेळी पाटोदा तालुक्यातील थेरला गावातील ड्रायव्हर संघटनेचे राहुल राख, उद्धव नागरे, हनु राख, आकाश राख, पिंटू शेख, सोमिनाथ राख, हवसराव राख, पप्पू सोनवणे, गोकुळ सांगळे, योगेश राख, रमेश सोनवणे, वैजिनाथ राख, बबन सोनवणे यांच्या सह ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top