रस्त्याची लढाई आता रस्त्यावरच लढण्यासाठी नारायणगव्हाणकरांचा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाचा केला निषेध

0



पारनेर/ प्रतिनिधी- सागर आतकर

        नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण येथे अपघातांची मालिका सुरू असताना महामार्गावरील अपघातग्रस्त बनलेल्या नारायणगव्हाण गावातील ग्रामस्थ जीव मुठीत धरून रस्त्यावर प्रवास करत असुन शालेय विद्यार्थ्यांचा रस्त्यावरचा प्रवास अत्यंत गंभीर बनला आहे. वेळोवेळी निवेदने आंदोलने करूनही प्रशासकीय अधिकारी खुर्चीवरून हालायला तयार नसल्यामुळे उडवाउडवीची उत्तरे देत ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार याठिकाणी होताना दिसत असल्यामुळे रस्त्यावरची लढाई रस्त्यावर लढण्यासाठी नारायणगव्हाणकरांनी महामार्गावर चक्का जाम करत रास्तारोको आंदोलन करत आपल्या वेदना मांडल्या.

यावेळी सुपा पोलिस स्टेशनचे नव्याने रूजु झालेले पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी आंदोलकांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत मध्यस्थी केली. संतापलेले ग्रामस्थ न्यायासाठी रस्त्यावरून हटायला तयार नव्हते परंतु पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून मार्ग काढू मी तुमच्या पाठीशी उभा राहील अशी भुमिका घेत आक्रमक ग्रामस्थांनी विश्वास ठेवत रस्त्यावरून बाजुला येवुन ग्रामपंचायत कार्यालयलात बैठक घेतली. यावेळी उपनिभागीय अधिकारी संजय भावसार, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगर, मंडल अधिकारी बी. जी.पवार, तलाठी शिरसाठ भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी गायकवाड भाऊसाहेब यांच्या समवेत कार्यालयात पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी आंदोलनकर्ते सचिन शेळके, सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सरपंच मशिषा जाधव, मा.सरपंच विलास खोले, चेअरमन दादासाहेब शेळके, लक्ष्मण शेळके, अर्जून वाल्हेकर, शिवाजी नवले, हुसेन शेख, किसन शेळके, विजय चव्हाण, बाळकृष्ण शेळके, मिलिंद शेळके, मिलिंद शेळके आदींसोबत चर्चा केली.

यावेळी भुमि अभिलेख विभागाचे अधिकारी हजर नसल्याने रस्त्याच्या मोजणीचा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी उपविभागीय अभियंता यांनी भुमि अभिलेख कार्यालयाला मोजणी फी भरल्याचे सांगत आम्हाला प्रस्ताव तयार करण्यासाठी नकाशा आवश्यक असुन पक्का नकाशा मिळत नसल्यामुळे मोजणीची समस्या येत आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी समजुतीचा नकाशा बनवुन दिला. यावेळी मंडल अधिकारी, महसुल प्रतिनिधी बी.जी. पवार, तलाठी शिरसाठ यांना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी धारेवर धरत तहसीलदारांनी भूमि अभिलेखच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे पत्र का दिले नाही असा सवाल केला. यावेळी तलाठी शिरसाठ यांनी तहसीलदारांना दुरध्वनीद्वारे फोन करत १६ तारखेला संबंधित सर्व विभागाच्या पारनेर येथे अंदोलनकर्ते ग्रामस्थ यांची बैठक घेण्याचे आश्वस्त केले व नारायणगव्हाणचा चौपदरीकरणाचा तिढा पारनेर तहसील कार्यालयात न सुटल्यास फसवणुक झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू पण रस्ता पूर्ण करून घेवु असे आंदोलनकर्ते सचिन शेळके यांनी सांगितले.

यावेळी पोलिक निरीक्षकांच्या मध्यस्तीने आंदोलन मागे घेण्यात आले, यावेळी दगडू हारदे, शिवाजी शेळके, काशिनाथ कांडेकर, धोंडींबा गायकवाड, भिमा जाधव,आप्पा शेळके, भिमबाई कांडेकर, बाळासाहेब काकडे, भाऊसाहेब नाईक, दादा ठुबे, लहानू शेळके, सुनिल शेळके, विकास पवार, बबन नवले, नितिन जाधव, अनिल शेळके आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यादरम्यान वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको सुटताच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top