अहमदनगर:
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव नगर शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त अवघे नगर शिवमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातून जिल्हा मराठा समाज प्रसारक मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणारी मिरवणूक नगरकरांचे आकर्षण ठरली. शिवजयंती निमित्त आ. संग्राम जगताप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
मिरवणुकीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत पारंपरिक कला, नृत्य सादर केले. तसेच विविध विषयांवरील समाज प्रबोधनाचे देखावे सादर करण्यात आले होते. यावेळी युवा पिढीने शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
उपनेते माजी आमदार अनिल राठोड मित्र मंडळाच्या वतीने परंपरेप्रमाणे जिल्हा मराठा संस्थेच्या वतीने काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच लेझीम खेळून आनंद व्यक्त केला.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद