महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी: सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील राज्याचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या स्वयंभू श्री माता मळगंगा देवीला निघोज येथील निघोज येथील कै. शांता सुदाम कोठावळे यांच्या स्मरणार्थ श्रीमती लक्ष्मीबाई गणपत लंके यांनी रोख देणगी ५१ हजार रुपये, देवीचा सोन्याचा टाक किमत दोन लाख ९० हजार रुपये, सोलर हायमॅस्क ७५ हजार रुपये अशाप्रकारे एकूण चार लाख एकवीस हजार रुपये देणगी वस्तूरुपी दिली. त्यामुळे श्रीमती लक्ष्मीबाई गणपत लंके या आज्जीचे सर्वत्र कौतुक होत असून देवीला मोठी देणगी दिल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात यांच्या हस्ते लंके आज्जी यांचा देवीचा फोटो, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आज्जीचे नातू विकास लंके, अनिकेत लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद, कोषाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, संघटक रामदासशेठ वरखडे, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव विश्वासराव शेटे, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, विश्वस्त संतोषशेठ रसाळ, शंकरराव लामखडे, रमेश आण्णा ढवळे, बबनराव ससाणे, सोमनाथ वरखडे, व्यवस्थापक महेश ढवळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद