महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी: सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना दिवाळीपूर्वी १२ टक्के लाभांश व कर्मचारी यांना १४ टक्के दराने सानुग्रह अनुदान व दिवाळी फराळासाठी १ बॉक्स किराणा किटचे वाटप करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन वसंत कवाद, व्हा. चेअरमन, नामदेव मामा थोरात व संचालक मंडळ यांनी मासिक मिटींग मध्ये घेण्यात आला.
दि. २८/१०/२०२४ पासुन संस्थेच्या सभासदांना १२ टक्के दराने लाभांश रक्कम ६० लाख ९१ हजार रुपये वाटप करण्याचे काम चालू केले असून त्याचबरोबर सेवकांना १४ टक्के सानुग्रह अनुदान २६ लाख ४२ हजार रूपये व संस्थेच्या ८५ सेवकांना प्रत्येकी २ हजार रुपयांचा दिवाळी फराळासाठी किराणा दिलेला आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री.वसंत कवाद, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नामदेव मामा थोरात, संस्थेचे संचालक श्री. चंद्रकांत लामखडे, श्री. शांताराम कळसकर, निघोज परिसरचे उपाध्यक्ष श्री. अमृता शेठ रसाळ, तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांचे हस्ते सेवकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.- वसंत कवाद
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.वसंत कवाद यांनी सर्व सभासदांना विनंती केली की संस्थेच्या सर्व शाखामध्ये सभासदांना १२ टक्के दराने लाभांश रक्कम सभासदांच्या सेव्हिंग खाते वर जमा केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी आपल्या खाते वर जमा केलेली लाभांशची रक्कम घेऊन जावी. अशी विनंती केली आहे. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. दत्तात्रय लंके, जनरल मॅनेजर संपतराव ठुबे सर्व विभाग प्रमुख, शाखाधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. शांताराम कळसकर यांनी केले आभार दत्तात्रय लंके यांनी मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद