
नगर तालुक्याचे विभाजन होऊन तीन मतदारसंघात समावेश झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य तालुक्याचे विकास करीत आहेत. परंतु हा विकास करताना जिल्हा परिषद सदस्यांना मर्यादा येतात. त्यामुळे नगर तालुक्यातील आमदार असूनही तालुक्याचा विकास खुंटलेला आहे.
नगर तालुक्याच्या विकासासाठी नगर तालुक्यातील नेतृत्व असणे गरजेचे आहे असे मत अनेकदा राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेले आहे. दर पंचवार्षिकला तालुक्यातील कोणी ना कोणी विधानसभेला उभे राहत आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार जोरदार सुरू आहे. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नगर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होत आहे.
या वेळी "तालुक्याचा विकास हाच आपला ध्यास" ब्रीद वाक्य घेऊनच कार्ले निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळेच त्यांना पारनेरसह नगर तालुक्यातून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
खबर पक्की विकासासाठी संदेश कार्ले आमदार नक्की...ही टँगलाईन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात फिरत आहे. या टॅग लाईनचा धसका महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी व नेत्यांनी घेतला आहे.
अजूनही कार्ले यांनी उमेदवारी मागे घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी महाविकासह महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु विकासाच्या मुद्या घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तोच मुद्दा मतदारांना भावला आहे.
त्यामुळे कार्ले यांना पारनेर व नगर तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद