माजी विद्यार्थ्यांनी दिल २० वर्षानंतर जून्या आठवणींना दिला उजाळा

0

                             



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथे श्री. मुलीका देवी विद्या मंदिर निघोज शाळेतील २००५  च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निघोज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महराज व सरस्वती प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दिपप्रज्वलंन करून करण्यात आली. याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २००४ -०५ चे सर्व गुरुजन व सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कारभारी मेसे सर हे होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
आपले पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेऊन हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे एकमेकांना ओळख लागते की नाही ही मनातील भावना होती. पण समोर आल्यानंतर सर्व शाळेतील आठवणी जाग्या होत गेल्या अश्या भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. विद्यार्थी स्नेह मेळाव्यानिमित्त माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या भावना तसेच आपल्या शालेय जीवनातील अनुभव, आपल्या शिक्षकानविषयी भावना व्यक्त केल्या. 

INOVERA (LABEL) Women Inovera Faux Leather Handbags Shoulder Hobo Bag Ladies Big Purse With Long Strap





 
आपल्याला जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी त्या संकटांना घाबरायच नसते. तो संकटांना सामोरे जातो तो जीवनात यशस्वी होतो.- एकनाथ पठारे सर (माजी प्राचार्य)

आपले जे ध्येय आहे आपला जो उद्देश आहे तो आपण निश्चित केला तर आपण आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करू शकतो.- तांबोळी मॅडम

यावेळी 2005 च्या या बॅच मधील दोन मित्र काळाच्या पडद्याआड गेल्याने एक मित्र या नात्याने मित्रांच्या मुलांच्या नावे काही रक्कम इन्वेस्ट करण्यात आली. 

या कार्यक्रमचे नियोजन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी केले होते. या कार्यक्रमचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत सुभाष पांढरकर यांनी केले, सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले तर आभार मंगेश लाळगे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top