शिवाजी वरखडे यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
शिरुर तालुक्यातील कर्डे येथील भैरवानाथ मंगल कार्यालयात येथे जि.प.प्राथमिक शाळेतील शैक्षणिक क्षेञात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा सन्मानाचा करण्यात आला.जि.प.प्राथ.शाळा माळवाडी येथील मुख्याध्यापक श्री.शिवाजी वरखडे यांना शैक्षणिक क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरुर पंचायत समितीने त्यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे,माजी आमदार अँड अशोक पवार, सभापती विश्वास कोहकडे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव ,जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे,सविताताई बगाटे ,रेखाताई बांदल ,राजेंद्र जगदाळे ,उपसभापती जयमाला जकाते ,पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे ,कुसूम मांढरे ,पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे ,माजी सभापती सुभाष उमाप ,शिरुर आंबेगाव तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पांचुदकर ,संजय पांचगे ,वैभव यादव ,राजेंद्र नरवडे, ,दत्ताञय हरगुडे ,गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे माळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाकरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश भाकरे ,पांडुरंग निचित गुरुजी ,सविता बनकर ,अरुण खोमणे,सुमन पठारे,विजया ताठे,मंदा वरखडे ,प्रगती वरखडे, डॉ. दौलत पांढरकर ,मळीभाऊ भाकरे ,स्वप्निल भाकरे ,बाळू भाकरे,बाबाजी लंके,पांडुरंग लंके,आबा लंके,किसन लंके,चंद्रकांत लंके,कृष्णाजी कवडे आदि मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top