पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुकयातील वनकुटे गावचे लोकनियुक्त सरपंच अँड राहुल झावरे यांच्या संकल्पनेतून सलग दुसरा वर्षी आपल्या गावात एक गाव एक गणपती संकल्पना या गणेश उत्सवात जपली आहे.त्यामुळे वनकुटे गावात असणारा अठरा पगड जाती - जमातीतील लोकांना बरोबर घेत सरपंच राहुल झावरे यांनी या गणेश उत्सवात सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
वनकुटे येथे एक गाव एक गणपती निमित्ताने बालचमु पासुन ते युवक व महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध धार्मिक व सास्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी उद्धव काळापहाड यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी" होम मिनिस्टरचे "आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवून या महिलांच्या माध्यमातून सरपंच वृक्ष दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. यात सहभागी झालेल्या महिलांना आंबा व आवळा झाडे भेट देण्यात आली असुन आपल्या घरासमोर दारासमोर या वृक्षांचे संर्वधन केल्यास त्या कुटुंबियांना घरपट्टी व पाणीपट्टी यामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा सरपंच राहुल झावरे व उपसरपंच बंडु कुलकर्णी यांनी केली आहे. तर या गणेश उत्सवाच्या काळात १०० रक्त बॅगचे रक्तदान करण्याचा संकल्प युवकांनी व्यक्त केला असुन यासाठी ८ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच युवकांसाठी क्रिकेट प प्रिमीयर लीग स्पर्धा तर बालचमुंसाठी चमचा लिंबू निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.तसेच माजी सैनिकाला या एक गाव एक गणपती आरतीचा मान देण्यात आला आहे.गेल्या वर्षी सुध्दा एक गाव एक गणपती संकल्पना ग्रामस्थांच्या मदतीने राबविण्यात आली होती.परंतु शासनाने आम्ही राबवित असलेल्या एक गाव एक गणपतीची दखल घेवुन प्रोत्साहन पर पुरस्कार दिले पाहिजे अशी अपेक्षा लोकनियुक्त सरपंच अँड राहुल झावरे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सरपंच राहुल झावरे, उपसरपंच बंडू कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य दिपक खामकर विकास गागरे भिमराज गांगड बबन मुसळे एक गाव एक गणपती मंडळाचे अध्यक्ष शुभम खैरे उपाध्यक्ष शक्ती साळवे बंटी बुचडे कार्याध्यक्ष आदिनाथ ढवळे गणेश देशमुख संजय खैरे कैलास मुसळे अमोल गागरे माजी उपसरपंच बाबाजी गागरे कानिफशेट लोणकर राजू डहाळे उत्तम खैरे काळे गुरुजी बबन खामकर रामभाऊ साळवे सुभाष खामकर टायगरशेठ शेख बाळासाहेब खामकर बाळासाहेब बर्डे,सिताराम औटी दगडूशेठ केदारी कारभारी मुसळे, बबन बर्डे, काशिनाथ भगत यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक मूठ धान्य पूरग्रस्तांसाठी.तालुक्यातील वनकुटे येथे एक गाव एक गणपती निमित्ताने विविध सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम आयोजित केले असुन याच बरोबर कोल्हापूर सांगली सातारा या भागातील पूरग्रस्तांच्या मदतीला एक मूठ धान्य..पूरग्रस्तांसाठी जमविण्याचे काम चालु असल्याचे सरपंच राहुल झावरे व उपसरपंच बंडुशेठ कुलकर्णी यांनी सांगितले आहे. त्यामुळे धान्य व इतर वस्तूंच्या रूपाने या गणेश उत्सवात काळात मदत जमा होणार आहे ती पूरग्रस्तांना पाठवली जाणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगितले आहे.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद