साईनाथ हायस्कूलच्या कृष्णा कवडे याच्या चित्राची महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत राज्यस्तरावर निवड*

0
(पारनेर प्रतिनिधी:- सागर आतकर)
कला संचनालय महाराष्ट्र शासन,माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये घेतलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर येथे १४ नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून पार पडला. पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील साईनाथ हायस्कूलचा विद्यार्थी चि.कृष्णा ज्ञानेश्वर कवडे याने नऊ ते बारा वयोगटात अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला त्याच्या चित्राची राज्यस्तर स्पर्धसाठी निवड झाली,या निमित्ताने या ठिकाणी कृष्णा कवडेचा सन्मानचिन्ह,प्रशस्तिपत्र व बक्षिस रक्कम देऊन सन्मान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शालिनीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच पारनेर तालुक्यातील मुलिकादेवी विद्या मंदिर निघोज येथील विद्यार्थिनी कु. दिशा शंकर झावरे व रांजणगाव मशीद येथील शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अपूर्वा नानासाहेब इकडे यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व शिक्षण समितीच्या सभापती सौ.राजश्रीताई घुले, शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे,जिल्हा परिषद सदस्य शाम माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे साहेब,उपशिक्षणाधिकारी हराळ साहेब सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या रेकी मॅडम स्पर्धा परिक्षक चित्रकार- कला शिक्षक अशोक डोळसे सर, भारताल सर तसेच विविध शाळेतील बक्षीस पात्र विद्यार्थी शिक्षक पालक या निमित्ताने उपस्थित होते या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात विविध विद्यालयातून ५३ हजार आठशे विद्यार्थ्यांनी चार वयोगटाततून सहभाग नोंदवला तालुकास्तरावर १२०० विद्यार्थ्यांच्या चित्र कामांची निवड करण्यात आली होती त्यातील ६० विद्यार्थ्यांच्या चित्राची जिल्हा स्तरावरून राज्य स्तरासाठी निवड करण्यात आली यानिमित्ताने नामदार सौ.शालिनीताई विखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन सांगितले पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता त्यांच्या मनाने त्यांना आवडते विषयांमध्ये कार्य करू द्यावे तसेच कलेची आवड  असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व कलेतील विविध उपक्रमासाठी जिल्हा परिषदेमार्फत वेगळा निधी उभारण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन यानिमित्ताने दिले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य शंकरराव माने साहेब, अळकुटीचे सरपंच बाबाजी शेठ भंडारी, प्राचार्य मंगेश जाधव,कला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजयजी पठाडे,निवृत्त कलाध्यापक रामदास कवडे, पारनेर तालुका कलाशिक्षक संघ पदाधिकारी व कलाशिक्षक बंधू भागिनी यांनी कौतुक व अभिनंदन केले. कलाशिक्षक संतोष कवडे, संपत रसाळ, विजय देवकर,पांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top