चंद्रकांत कदम । प्रतिनिधी
औदयोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे भविष्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस कामगार कायद्यांमधील होणारे बदल म्हणजे कामगारांचा गळा घोटण्याचे काम केले जात असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांनी व्यक्त केले.
![]() |
कामगारांना मार्गदर्शन करताना महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले. |
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने रांजणगाव, पुणे व परिसरातील कामगारांना नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ढोकले बोलत होते. सध्या कामगार कायद्यामध्ये होत असलेले बदल कामगार हिताचे व्हायला पाहिजे परंतु उद्योगपती सरकारला हाताशी धरून कामगार हिताविरोधी कायदे आणले जात असल्याने कामगारांचे भवितव्य धोक्यात आले असल्याची खंत यावेळी ढोकले यांनी व्यक्त केली. कारखानदारीमध्ये कंत्राटीकरण वाढले असून कायम कामगारांची नोकरी धोक्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे कारखान्याचा विचार व बाहेरील सर्व गोष्टींचा विचार करून संघटना प्रतिनिधींनी निर्णय घेणे गरजेचे आहे. कामगार होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात गेले तर त्यांना कामावरून काढून टाकण्याचे प्रकार अनेक कारखान्यांमध्ये होत आहे. शासनाचा कामगारांच्या बाबतीत नवीन कायदा येत असून कामगारांच्या नोकऱ्या ५८ वर्षांवरून कमी ५३ वर्षांवर करण्यात यावी यासाठी लवकरच नवीन कायदा लागू होत आहे. यामुळे कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागनार आहेत. कायम कामगार टिकण्यासाठी संघटना एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे उपाध्यक्ष राजूअण्णा दरेकर, दत्तात्रय येळवंडे, कैलास शिंदे,अविनाश वाडेकर, गणेश जाधव आदींसह राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी व परिसरातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांना मार्गदर्शन करताना महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद