निघोज येथील कुंडावर बेवारस महीलेचा मृतदेह आढळला.

0
निघोज (प्रतिनिधी )-पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजणखळगे येथील कुंडात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आज दुपारी आढळून आला आहे. साधारण 35 ते 36 दरम्यान वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता होता.

 त्यावर पांढऱ्या रंगावर काळे टिपके असे कपडे होते. साधारण तीन महिन्यापूर्वी हा मृतदेह पाण्यात असण्याची शक्यता निघोज पोलीस दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल अशोक निकम यांनी माहीती देताना सांगितले आहे. हा मृतदेह पुर्णपणे कुजला होता तसेच शरीराचा बराचसा भाग अलिप्त झाला होता. दि. 17 रोजी दुपारी काही लोकांनी कुंडात हा मृतदेहाचा काही भाग तरंगताना दिसल्याने त्यांनी याबाबत निघोज पोलीसांना माहीती दिली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. जाग्यावर शवविच्छेदन करण्यात आले. तसेच सायंकाळी साडेसहा वाजता हा मृतदेह कुंड परिसरात पुरण्यात आला. यावेळी कामगार तलाठी विनायक निंबाळकर व हेड कॉन्स्टेबल अशोक निकम यांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण केले. अधिक माहितीसाठी निघोज येथील हेडकाँस्टेंबल अशोक निकम मोबाईल नंबर 888 883 0908 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पारनेर पोलीसांनी केले आहे.पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विजयकुमार बोत्रे तसेच निघोज पोलीस या दुर्घटनेचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top