घरात कोणी नेहमी आजारी पडत असेल किंवा त्याला वारंवार ताप येत असेल तर त्याकडे दूर्लक्ष करून नका! तो 'डेंगू' असू शकतो... 'डेंगू' हा संसर्गजन्य आजार असून या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून युध्दपातळी जनजागृती केली जाते. परंतु नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे त्यात शासनाला अपयश आले आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. वारंवार येणारा ताप, अंगदुखी व डोकेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षणं आहेत.
डंगूचा ताप महाभयानक असतो. उपचाराअभावी रुग्ण दगावतातही. डेंगूमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कारण त्याच्यांत रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. जगात दरवर्षी सुमारे 2 कोटी डेंगूची रुग्ण आढळतात. 'डेंगू' हा बॅक्ट्रेरियाद्वारे पसरत असतो. त्याचे चार प्रकार असतात. डेंगूची लागन झालेल्या व्यक्तीला भयानक ताप येतो, त्याच्या हातापा यांच्या जॉइंटमध्ये मरणाच्या वेदना होत असतात.
'डेंगू' हा मलेरियाप्रमाणे डास चावल्याने पसरतो. 'डेंगू' हा आजार पसरविणार्या डासाला 'एडीज डास' म्हटले जाते. हा डास दिवसाही चावतो. 'डेंगू' हा आजार व्यक्तीच्या रक्तात मिसळत असतो. डेंगू झालेल्या रुग्णाला 'एडीज डास' चावतो व तोच डास सामान्य व्यक्तीचा चावतो व त्यालाही 'डेंगू' आजाराची लागण होते. अशा प्रकारे हा आजार पसरत असतो.
डेंगूची लक्षणे-
- अचानक थंडी वाजून येऊन प्रखर ताप येणे.
- डोके, हाता पायात प्रचंड वेदना होणे
- अशक्तपणा येणे, भूख न लागणे व जीव मळमणे.
- कोणत्याच पदार्थाची चव न येणे.
- गळा दुखणे तसेच गळ्यात काटा टूचण्यासारखे वाटते.
- सर्वांगावर लाल सुरकुत्या पडून प्रचंड वेदना होणे.
उपाय-
- पेरासिटामॉलची एक टॅबलेट्स दुधासोबत घेऊन ताप नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा.
- रुग्णास तात्काळ रूग्णालयात हलवावे.
- डेंगू रुग्णास डिस्प्रीन, एस्प्रीन देऊ नये.
- जर ताप 102 डिग्रीवर अथवा त्यावर गेला असेल तर त्याला कमी करण्यासाठी हाइड्रोथेरेपी (जल चिकित्सा) करावी.
- रुग्णास हलका आहार द्यावा.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद