प्रतिनिधी / पारनेर
पारनेर तालुक्यातील जवळे येथील पत्रकार शिरीष शेलार यांना धमकावले प्रकरणी महावितरण चा ठेकेदार अरुण रसाळ याच्या वर कारवाईचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात पाठवणार असल्या ची माहिती महावितरणचे उप अभियंता प्रशांत आडभाई यांनी दिली.
काही दिवसापूर्वी जवळे येथील कुकडी कालव्या जवळ विजेच्या तारा पाण्याजवळ लोंबकळत असल्याने सोमवारी रात्री दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध का केली.? हाच राग मनात धरून पत्रकार शिरीष शेलार यांना महावितरण चा ठेकेदार अरुण रसाळ याने मी प्रवीण रसाळ चा भाऊ आहे. अशा बातम्या कशा छापल्या..? तुम्हाला बघून घेतो, कितीही बातम्या छापल्या तरी आमचे काही वाकडे होत नाही.. असे म्हणून धमकावले.या प्रकारानंतर पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विजय वाघमारे,लोकमतचे तालुका प्रतिनिधी विनोद गोळे ,किरण शिंदे,पारनेर तालुका मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे,मा.अध्यक्ष सतिष रासकर, लोकमतचे पत्रकार भास्कर कवाद, भगवान श्रीमंदीलकर,आनंदा भूकन,विजय रासकर, सागर आतकर यांच्या सह पत्रकांरानी निषेध करत पारनेरला महावितरणचे उपअभियंता प्रशांत आडभाई यांना कारवाईसाठी निवेदन दिले.
निघोज येथे जेष्ठ पत्रकार व तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे,तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी,मा.अध्यक्ष सतिष रासकर, निघोज परीसर मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष संतोष इधाटे,लोकमतचे पत्रकार भास्कर कवाद,भगवान श्रीमंदिलकर,आनंदा भूकन,बाबाजी वाघमारे, सुधीर पठारे, विजय रासकर, सागर आतकर हे निघोज पोलीस चौकी समोर एकत्र जमले.त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत ठेकेदार अरुण रसाळ याच्या वर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. या वेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असुन, त्यानंतर पारनेर येथे महावितरण चे उपअभियंता प्रशांत आडभाई यांना जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे,पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विजय वाघमारे,तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे,लोकमतचे तालुका प्रतिनिधी विनोद गोळे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी,किरण शिंदे,शशिकांत भालेकर,शिवाजी पानमंद यांच्यासह सर्व पत्रकारांनी भेट घेऊन ठेकेदार अरुण रसाळ वर कारवाई करण्याची मागणी केली.कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला.
Ok
उत्तर द्याहटवा