जवळ्यात बिबट्याचे बचड्यांसह दर्शन.हल्ल्यात मेंढी ठार... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

0
जवळा/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जवळे परिसरात ग्रामस्थांना आता तर बिबट्यांचे एक दोन नव्हे तर तीन तीन बिबटे आपल्या कुटुंबासह दर्शन देऊ लागले आहेत,त्यामुळे भीतीने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत इतकेच काय तर त्यांचा उपद्रव ही वाढू लागला आहे. जवळे परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्यांची संख्या वाढली असून ग्रामस्थामध्ये त्यांची दहशत निर्माण पसरली आहे.
सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे...


दि.१९ रोजी पहाटे चारच्या सुमारास अलभर वस्ती नजीक शेतकरी बाजीराव अलभर यांच्या कांद्याच्या शेतात बाळू धरम या मेंढपाळाने आपल्या मेंढ्याचा तळ टाकला होता. पहाटेच्या सुमारास मादी बिबट्या सह तिच्या दोन बछड्यानी मेंढ्याच्या कळपावर हल्ला करत वाघूर लावली, असतानाही त्यातून झडप घालून मेंढी पळविली व ठार केली.परंतु कुत्र्यांच्या आवाजाने बाळू धरम जागे झाले असता त्यांनी बिबट्याला व बछड्याना पाहिले. कुत्र्यांच्या जास्त गोंगाटाने बिबट्यांनी  मृत मेंढीला सोडून देत धूम ठोकली.बिबट्याचे कुटुंब हे बर्‍याच दिवसापासून या परिसरात सतत शेतात काम करताना अनेकांनी पाहिले असल्याचे तुकाराम अलभर यांनी सांगितले.जवळे परिसरात आता तर बिबट्यांचे एक दोन नव्हे तर तीन तीन बिबटे आपल्या कुटुंबासह दर्शन देऊ लागले आहेत,त्यामुळे नागरिक बिबट्यांच्या भीतीने चांगलेच धास्तावले आहेत. वारंवार तक्रारी करूनही त्यांना पकडण्यासाठी वनविभाग कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही त्यामुळे वनविभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त होत आहे.सदर गरीब मेंढपाळाला भरपाई देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम अलभर,बाजीराव अलभर यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top