अहमदनगर - महाराष्ट्र राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन अध्यक्ष नितेश थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिषदेची स्थापना झाली. ही संघटना 2012 च्या राज्य युवा धोरणाच्या जी.आर. ला अनुसरून गेली पाच-सहा वर्षे झाली काम करत आहे. संघटनेत खूप जोराने वाढ होत आहे.
१७ मार्च २०२० ला अहमदनगर येथे बीड जिल्हा समन्वयक प्रताप दातार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य युवा परिषदेची संकल्पना,धेय, उद्देश, विस्तारीत कार्यकारणी नियुक्ती राज्यस्तरीय युवा परीवर्तन शिबीर व समन्वयक नेमणूक या विषयावर महत्वपूर्ण बैठक झाली. अहमदनगर युवती जिल्हा समन्वयक पदी डाॅ.अनुराधा मेचे, अहमदनगर जिल्हा संघटक पदी डाॅ.मकसूद शेख, अहमदनगर जिल्हा उप समन्वयक पदी बापू मुठे यांची निवड झाली. तसेच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका समन्वयक पदी नागेश जरे यांची निवड झाली. सर्वांचे प्रताप दातार यांच्या हस्ते सन्मान करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद