पिंपळनेर - एकोबा तुकोबा निळोबा च्या नामघोषात टाळमृदंगाच्या गजरात अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराज यांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निळोबाराय यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
पिंपळनेर -[प्रतिनिधी शिरीष शेलार] एकोबा तुकोबा निळोबाच्या नामघोषात टाळमृदंगाच्या गजरात अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पारनेर तालुक्यातील श्री.क्षेत्र पिंपळनेर येथील श्री. संत निळोबाराय महाराज यांच्या राहत्या वाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आळंदी संस्थानचे ट्रस्टी श्री. संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प माणिक मोरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निळोबाराय यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
ह.भ.प माणिक मोरे यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की चालू वर्षी कोरोना ने देशात व जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने आषाढी वारी रद्द केली असून मोजक्याच वारकरी घेऊन चालू वर्षी आषाढी वारी संपन्न करण्याचे आदेश आहे. वारकरी संप्रदाय जगाला व देशाला चांगला मार्ग दाखवला आहे. त्यामुळे आषाढी वारी होणार नसले तरी आपण आपल्या घर परिसरात असणारे पडीक जागा शेताच्या बांधाच्या कडेला देशी झाडे लावून पर्यावरण समतोल राखण्याचे कार्य करावे प्रत्येक सूक्ष्मजीवामध्ये पांडुरंग आहे. तसेच स्वच्छता अभियान राबवून आपला परिसर स्वच्छ करावा यातूनही आषाढी वारीचे इतके पुण्य आपल्या पदरी पडेल असा मोलाचा सल्ला उपस्थित वारकऱ्यांना दिला.
यावेळी पारनेर तालुकाचे आमदार निलेश लंके, देहू आळंदी ट्रस्ट ह.भ.प माणिक मोरे, निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत, निळोबाराय पालखी सोहळा प्रमुख व निळोबाराय वंशज गोपाळ बुवा मकाशेर, सचिव लक्ष्मण खामकर, सुरेश ज्ञानदेव पठारे, त्रिंबक आन्ना गाजरे, सरपंच शितल रासकर, उपसरपंच मारुती रासकर, सोमनाथ मोझे, विणेकरी पांडुरंग रासकर, पालखी सोहळा मानकरी मल्हार रासकर, पारनेर पोलीस उपनिरीक्षक विजय बोत्रे बीट अमलदार अण्णासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
30 जून रोजी संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज निळोबाराय महाराज यांची भेट वाखारी पंढरपूर येथे दरवर्षी प्रमाणे होणार आहे. चालू वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या आदेशानुसार फक्त पाच भाविक श्रीक्षेत्र पिंपळनेर येथून नवमी सोमवार दिनांक 29 जून 2020 रोजी रात्री एसटी बसने निळोबाराय यांच्या पादुका घेऊन प्रस्थान होणार असून दशमी मंगळवार दिनांक 30 जून 2020 रोजी निळोबारायाचे पादुकांचे दर्शन करून पंढरपूरच्या पांडुरंगाला निळोबारायांचा नैवेद्य अर्पण करून पुन्हा लगेच पिंपळनेर यात्रा येणार आहे - निळोबाराय देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष अशोकराव सावंत
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद