जवळे: पारनेर तालुक्यातील जवळे व गुणोरे परिसरात पावसाने सलग तीन दिवसापासून जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा समाधान व्यक्त करत आहे. तसेच जवळे, निघोज, शिरुर मुख्य रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांची अचानक आलेल्या जोरदार पावसाने चांगलीच धांदल उडाली. त्यामुळे भाजीपाला रस्त्यावर ठेवूनच विक्रेत्यांनी आडोसा घेतला. २५ जुलै २०२० अखेर मागील वर्षी पेक्षा यावर्षी दुप्पट पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच काळात १०० मिली पाऊस झाला होता, तर चालू वर्षी दोनशे मिली पेक्षाही जास्त पाऊस झाल्याने परिसरातील ओढे-नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
![]() |
फोटो: शिरीष शेलार |
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद