पारनेर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने (दि. २७ जुलै) पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेरमध्ये ५० बेडचे कोव्हिड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा व रक्तदान शिबीराचे आयोजन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व संंपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना बेड ची कमतरता भासत असताना. पारनेर येथे महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत कोविड सेंटर उभारले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.- विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी
कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू लागला अशा अडचणीच्या वेळी रुग्णांना रक्ताची कमी भासू नये या हेतूने रक्तदान शिबिरसह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी महाराष्ट्र राज्यातील पहिले अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्यामुळे याचा फायदा पारनेर तालुक्यातील रूग्णांना होणार असल्याचा आशावाद विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यामळे या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबीराचे आयोजन करून समाजाला उपयोगी कार्यक्रम राबविले आहे. यावेळी १ लाख मास्क व सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले.
या कोविड सेंटरसाठी 20 लक्ष रुपयांचा निधी शिवसैनिकांनी उपलब्ध करून दिला असुन याचा फायदा समाजाला होणार आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, काशिनाथ दाते, गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले, युवानेते अनिकेत औटी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, नगराध्यक्षा वर्षा नगरे, दुधसंघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, पं.स.सदस्य दिनेश बाबर, अशोक कटारिया, शहरप्रमुख निलेश खोडदे आदी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद