पारनेर: देशातील कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग पाहता ऑनलाईन झालेल्या शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा किती लाभ होतो किंवा नाही हा आता संशोधनाचा विषय ठरेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणारी मोबाईल नेटवर्किंगची समस्या त्यालाच जोड असणारी अखंडित विद्युत पुरवठ्याची समस्या, शेतीप्रधान अर्थव्यवस्थेमुळे आधीच आर्थिक चणचणीबरोबर ग्रामीण भागात असणारा अशिक्षीत पालक वर्ग हे सर्व लक्षात घेता ऑनलाईन शिक्षण पद्धत्ती ग्रामीण भागासाठी बलशाली कशी काय ठरेल, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती ही ग्रामीण भागासाठी फोल ठरल्याचे दिसत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था व ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे ग्रामीण व शहरी मुलांमध्ये वाढत चाललेली शैक्षणिक गुणवत्तेतील दरी ही एक नविन गंभीर समस्या नव्याने निर्माण होताना दिसत आहे.
गरिब श्रीमंत दरीसोबतच मुलांमधील शैक्षणिक गुणवत्तेतील दरी संपवण्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
खासगी शाळांमधील शिक्षकांचा शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचे वेतन व शासकीय शाळांमधील शिक्षकांचा शिक्षणाचा दर्जा व त्यांचे वेतन यामध्ये असणार्या विरोधाभासाबरोबर शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांना असणारा कामाचा व्याप यावरही शासनाने चिंतण करणे गरजेचे आहे. देशाला बलशाली करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता उभी करण्यासाठी, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी दुर करण्यासाठी शासणाने प्रशासनाने अभ्यासपुर्ण नियोजन समितीचे गठण करणे गरजेचे आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी व्यक्त केले.
युवा शक्ती राष्ट्राची खरी संपत्ती असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तळागाळात जावुन अहोरात्र कष्ट घेणार्या आदर्श शिक्षकांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या समस्यांवर काम केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकताना दिसतील - शरद पवळे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद