पारनेर:- पारनेर तालुक्यातील तालुका तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कोरोनामुळे उद्भवलेली रक्ताची कमतरता याची जाणीव असल्याने मंगळवार दि. २९ रोजी भव्य असे रक्तदान शिबिराचे कन्हेर ओहोळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उदघाटन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते पार पडणार असून यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पारनेर शहरातील हे प्रथमच रेकॉडब्रेक असे भव्य रक्तदान शिबीर असणार आहे. या मध्ये नगर येथील आनंदऋषी ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक, जनकल्याण रक्तपेढी, अष्टविनायक रक्तपेढी या चार रक्तपेढ्यांच्याद्वारे हे रक्तसंकलित केले जाणार आहे. पाचशेपेक्षा अधिक रक्त पिशव्यांचे संकलन केले जाणार असून नागरिकांनी रक्तदान करून या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा दूर करण्यास या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन युवराज पठारे यांनी केले आहे.
लॉकडाऊन काळात देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शहरातील अनेक कुटुंबांना युवराज पठारे यांनी किराणा वस्तूंच्या स्वरूपात भेट देत निराधार व्यक्तींना आधाराचा हात दिला होता. तसेच शहरातील परिसरात निर्जंतुकीकरणाची फवारणी करत सॅनिटायझर व मास्कचे देखील वाटप केले होते.युवराज यांनी कुस्ती क्षेत्रात पिढीजात नावलौकिक मिळविलेले असून आपल्या पारनेर तालुक्यात देखील कोल्हापूरच्या धर्तीवर अस्सल मातीतील पहिलवान घडवण्याचे काम शिवछत्रपती कुस्ती संकुलनाच्या माध्यमातून सुरू आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद